Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पत्रकार सुनील लांडगे यांना “भागवत धर्म प्रसारक पुरस्कार” जाहीर

पिंपरी | पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे पिंपरी चिंचवड विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे यांना यावर्षीचा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंढरपूर आणि जळगांव येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर या संस्थेच्या वतीने दरवर्षी पालखी सोहळ्यातील कार्य व भागवत धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी कै. भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार देऊन पंढरपूर येथे गौरव करण्यात येतो. श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा, शाल, श्रीफळ व संत मुक्ताबाई चरित्र ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप असते. यावर्षीचा पुरस्कार पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

हेही वाचा    :    Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!

सुनील लांडगे हे दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे माजी कर्मचारी असून सध्या ते महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांमध्ये पिंपरी चिंचवड विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सुनील लांडगे हे भोसरीतील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबीयांचा वारकरी संप्रदायाचा वारसा ते भक्तिभावाने पुढे चालवीत आहेत. माध्यम क्षेत्रात काम करीत त्यांनी मागील २५ वर्षापासून देहू ते पंढरपूर वारीचे ‘वारीच्या वाटेवर’ हे सदर लेखन करून भागवत धर्माचा विचार, प्रचार व प्रसार घरोघरी पोहोचविला आहे. सुनील लांडगे यांना यापूर्वी महर्षी नारद पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचा मानाचा मोरया पुरस्कार देखील मिळाला आहे. पिंपरी चिंचवड शहराचे प्रथम महापौर व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी सुनील लांडगे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, दि. ६ जुलै रोजी पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई मठामध्ये मान्यवरच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button