Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाची ‘किसान आत्मनिर्भर यात्रा’
रयत क्रांती मोर्चोचे सदाभाउ खोत, आमदार गोपिचंद पडळकर यांचे नेतृत्त्व
भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात
सांगली । प्रतिनिधी
केंद्रीय कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता किसान मोर्चा तर्फे आयोजित “किसान आत्मनिर्भर यात्रा’ सांगली येथून सुरू केली आहे.
यावेळी भाजपाचे आमदार ॲड. आशिष शेलार, आ. सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर, माजी आ. सुरेश हळवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.
वाळवा तालुक्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मस्थान असलेल्या येडेमच्छिंद्र या गावातून किसान आत्मनिर्भर यात्रेला सुरूवात झाली.
यात्रेला सुरूवात करण्यापूर्वी आमदार आशिष शेलार यांनी कराड येथील प्रिती संगमावर जावून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले.





