आमदारकी, खासदारकी भोगली पण एक शब्द तरी पूर्ण केला का? विखेंचा लंकेंवर निशाणा

Sujay Vikhe : अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये कायम वाक् युद्ध सुरू असतं. त्यात आता पुन्हा एकदा विखेंनी अश्वासनांच्या पुर्तीवरून निशाणा साधला आहे. विखे म्हणाले की, आश्वासाने देऊन लोकांनी आमदारकी व खासदारकी भोगली पण एक शब्द तरी पूर्ण केला का? असा सवाल त्यांनी केला.
सुजय विखे एका कार्यक्रमासाठी पारनेर तालुक्यात आले होते. त्यावेळी लंकेंच्या बालेकिल्ल्यात विखेंनी जोरदार बॅटिंग केली. त्यावेळी ते म्हणाले की, जो तालुका गेल्या 30 वर्षांपासून अश्वासनांवर जगला आहे. तेथील नेत्यांनी आश्वासाने देऊन लोकांनी आमदारकी व खासदारकी भोगली. त्यात आताच लोकसभेच्या भाषणांमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण झाली का? निवडून येण्यासाठी जनतेला दिलेला एक शब्द तरी पूर्ण केला का? तर खोटं बोलायला जमत नाही. म्हणून माझा कार्यक्रम झाला. जे निवडून आले. त्यांच्याकडे काम घेऊन जाऊन उपयोग नाही, त्यांचेच कोणी ऐकत नाही. असं म्हणत विखेंनी लंकेंवर जोरदार हल्ला केला.
हेही वाचा – वर्षअखेरीस पालटणार पुणे विमानतळाचे रुपडे; डिसेंबरअखेर पूर्ण होणार जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम
दरम्यान या अगोदर लंकेंनी विखेंना नगर-मनमाड रस्त्यावरून घेरलं होतं. खासदार म्हणून वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आपण मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यात मी नगर शहरातील बहुचर्चित असा नगर-मनमाड रस्त्यासाठी देखील गडकरींकडे मागणी केली. त्यामुळे आता ही रस्ता होण्यास कोणताही अडथळा येणार नाही. मात्र राजकारणात दोन वर्ग असतात. एक स्वत: च केलेल्या कामांवर बोलणारा आणि दुसरा कोणतही काम न करता दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेणारा असतो. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. असं म्हणत लंके यांनी सुजय विखेंवर नगर-मनमाड रस्त्यावर बोलताना त्यांनी माजी खासदार सुजय विखेंवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं होतं.