breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप करणार’, अदर पूनावाला प्रकरणात आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट

मुंबई – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपल्याला धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. टाइम्स या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यामध्ये त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. या प्रकरणाबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.अदर पुनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. दिशादर्शन जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्या पक्षाला उघडं करण्याचं काम परिस्थिती निवळल्यानंतर भाजप करणार आहे. माझ्याकडे आणि पक्षाकडे याची माहिती आहे. त्यावर आज भाष्य करणार नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावं, आमच्याकडे माहिती येत आहे, असा इशाराही शेलारांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटात आज आम्हाला राजकारण करायचं नाही. लोकांची सेवा करणं भाजपने धोरण आखलं आहे. केंद्र सरकारने पुनावाला यांना सुरक्षा पुरवत आपलं काम चोख केलं असल्याचं आशिष शेलार म्हणाले. यावेळी शेलांरानी पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निकालावरही भाष्य केलं.

दरम्यान, भाजपला पुर्ण विजय मिळवता आला नसला तरी यशाचं मोजमाप करायचं झाल्यास यशाचा पगडा भाजपकडेच आहे. कम्युनिस्ट रसातळाला गेले, काँग्रेसचं बाष्पीभवन झालं. ममता बॅनर्जी यांची म्हणावी तशी वाढ झाली नसल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button