breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीराजकारण

माजी क्रिकेटर अंबाती रायडूची राजकारणात एन्ट्री? ‘या’ पक्षात करणार प्रवेश?

Ambati Rayudu : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू याने आयपीएल २०२३ नंतर क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत होता. दरम्यान, अंबाती रायडू आता राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या वायसआर काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. रायडूने मुख्यमंत्री रेड्डी यांची एकदा नव्हे तर दोनदा भेट घेतली आहे. त्यामुळे रायडू राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अंबाती रायडू आंध्र प्रदेशातील कृष्ण किंवा गुंटूर जिलह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. यासाठी त्याने वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची दोनदा भेट घेतली आहे.

हेही वाचा – ‘आदिपुरूष’ मधील संवादांवर संतापले रामायणचे लक्ष्मण

वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या भेटीनंतर अंबाती रायडु म्हणाला की, मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी हे माझ्यासारख्या तरूणांसाठई प्रेरणास्तोत आहेत, ज्यांना राजकारणात उतरायचे आहे त्यांना ते नक्कीच मदत करतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button