breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चौंधे-पाटील टीम ठरली वाकड वुमन्स क्रिकेट लीगची मानकरी; राहुल कलाटे फाउंडेशनचा उपक्रम

पिंपरी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राहुल कलाटे फाऊंडेशन आयोजित वुमन्स क्रिकेट लीग वाकड 2022 स्पर्धेचे पहिले पारितोषिक चौंधे पाटील टीमने पटकावले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राहुल कलाटे फाऊंडेशनच्या वतीने वुमन्स क्रिकेट लीग वाकड 2022 ही स्पर्धा घेण्यात आली. दिवस रात्र चाललेल्या या सामन्यांमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक चौंधे पाटील टीमने पटकावले. द्वितीय पारितोषिक टीम अव्हेंजरने, तृतीय पारितोषिक टीम फ्रंटलाईन आणि चतुर्थ पारितोषिक टीम प्रेसिडेंटने पटकावले.

शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, पत्रकार शीतल पवार, सामाजिक कार्यकर्त्या सारिका श्रीखंडे, किरण वडगामा, शंभू घसीटा, दत्तात्रय देशमुख, सुधीर देशमुख, शिवाजीराव कटके, विठ्ठलतात्या कलाटे, विजय कलाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button