ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदाचा पदभार ज्योत सोनवणे यांच्याकडे..!

मोरवाडी येथे विविध प्रकारचे ट्रेड्स शिकवले जातात. तर कासारवाडी येथे मुलींसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था सुरु

पिंपरीः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदाचा पदभार गटनिदेशक ज्योत सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात दोन ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फात विद्यार्थ्यांना विविध ट्रेड्सचे अभ्यासक्रम शिकवले जातात. यामध्ये मोरवाडी येथे विविध प्रकारचे ट्रेड्स शिकवले जातात. तर कासारवाडी येथे मुलींसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे. येथे मुलींसाठी विविध ट्रेड्स शिकवले जातात. याठिकाणी प्राचार्य पदासह एक गटनिदेशक आणि सात निदेशक पदे आहेत यातील प्राचार्य पद रिक्त होते. या रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात गटनिदेशक ज्योत सोनवणे यांना पदभार देण्यात आला आहे.

याबाबतचा आदेश अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या स्वाक्षरीने निर्गत करण्यात आला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मोरवाडी येथील ओद्योगिक प्रशिक्षण विभागाचे प्राचार्य शशिकांत पाटील तसेच ओद्योगिक प्रशिक्षण विभागातील गटनिदेशक प्रकाश घोडके, शर्मिला काराबळे, मनोज ढेरंगे, राजकुमार तिकोने, किसन खरात आणि निदेशक मंगेश कालापुरे, रविंद्र ओव्हाळ, सचिन तापकीर, अमोल शिंदे, सतीश गायकवाड, तानाजी कोकणे, योगेश गरड, गणेश सुर्वे, किसन गावडे, भानुदास दुधाळ, विकास क्षीरसागर, विशाल रेंगडे, शिवदास वाघमारे, सोमनाथ शिंदे, जितेंद्र काटवटे, जीवन ढेकळे तसेच कासारवाडी आय टी आय मधील बबिता गावंडे, वंदना चिंचवडे, मनसरा कुमावनी, हेमा कोंडे, सोनाली नीलवर्ण, पूनम गलांडे, सिद्धार्थ कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

कासारवाडी येथील ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॉस्मेटॉलॉजी (ब्युटी पार्लर), डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर (डी.टी.पी.ओ.), कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, फॅशन डिझाईनिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, हॉस्पिटल हाऊस किपींग, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक अशा विविध ट्रेड्सचा समावेश आहे. या औद्यॊगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. मुलींना देखील स्वयंरोजगराच्या दृष्टिने प्रशिक्षित केले जात आहे. याठिकाणी असलेल्या ट्रेड्सच्या दृष्टीने विविध औद्योगिक संस्थांशी समन्वय ठेवून रोजगाराच्या संधी या विद्यार्थीनींना उपलब्ध करून देण्यासठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नव नियुक्त प्राचार्य ज्योत सोनवणे यांनी सांगितले. तसेच स्वयं रोजगार निर्मितीसाठी विद्यार्थिनींना आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button