breaking-newsपिंपरी / चिंचवड

CoronaVirus : नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे जमा करा – इरफान सय्यद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना व्हायरस आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवसाचे लाॅकडाऊन जाहिर केले आहे. देशभरातील नागरीकांनी या आदेशाचे पालन करणे प्रथम कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील असंघटीत बांधकाम कामगार सुद्धा सरकारी आदेशाचे पालन करीत आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी या नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात सरसकट पैसे जमा करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री व सचिव यांच्याकडे केली आहे.

सय्यद यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात असंघटीत क्षेत्रातील अनेक कामगार आहेत. बांधकाम कामगार हा असाच हातावर पोट असणारा असंघटीत कामगार आहे. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. या मंडळाअंतर्गत नोंदीत जिवित बांधकाम कामगारांची संख्या १३ लाख ऐवढी आहे. कष्ट करून रोजचे रोज हातावर पोट असणा-या या बांधकाम कामगारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशाचे पालन करत त्यांना घरातच राहावे लागत आहे.

रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणारे हे कामगार २१ दिवस खाणार काय ? काम बंद असल्याने पोटापुरते कमवणा-या या कामगारांची परिस्थिती 2 दिवसातच बिकट झाली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडेे नोंदणीकृत बांधकाम कामगार यांची माहिती आहे. तसेच मंडळाकडे सेस (निधी) जमा आहे. संकटाच्या या कठीण काळात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळाने या आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

महाराष्ट्र मजदूर संघटना पुणे जिल्ह्यातील २५ हजार नोदंणीकृत बांधकाम कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री व सचिव यांना मागणी करण्यात आली आहे की, सर्व नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात सरसकट रक्कम १० हजार DBT मार्फत जमा करावे. जेणे करून या २१ दिवसांच्या लाॅकडाऊनच्या संकटमय काळात ते आपला उदरनिर्वाह करू शकतील, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button