breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

कर्नाटकातील निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचा हनुमान चालिसा ट्वीट करत भाजपाला खोचक टोला!

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या २४४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. कर्नाटकमध्ये भाजप पिछाडीवर आहे तर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यारून भाजपवर टीका केली आहे.

कर्नाटक निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झालीय. काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार बनवत असल्याचं स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत भाजपने बजरंग बली अर्थात हनुमानाला निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. परंतु खुद्द प्रभू हनुमानाला देखील ही गोष्ट आवडलेली दिसत नाहीये. हनुमान चालिसा मध्ये एक कडव आहे.

हेही वाचा – शुन्य सावली दिवस म्हणजे काय? तुमच्या शहरात देखील पाहता येणार

“महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी..!”
अर्थात- महावीर बजरंग बली हे पराक्रमी आहेत. ते दुर्जनांच निराकरण करतात तर सज्जनांच्या सोबत उभे राहतात. थोडक्यात आज खुद्द बजरंग बलीने देखील ते नेमके कोणासोबत आहेत हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या देशाला दाखवून दिले आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत भाजपला डिवचलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button