breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘कर्नाटकच्या जनतेनं भाजपाला धडा शिकवला..’; कर्नाटकातील निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या २४४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. कर्नाटकमध्ये भाजप पिछाडीवर आहे तर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यानुसार काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल आणि यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकमध्ये भाजपाच्या झालेल्या मोठ्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, अलिकडच्या काळात भाजपाकडून इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यात आमदार फोडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे सूत्र वापरलं आहे. कर्नाटकातही त्यांनी हेच केलं.

महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेंनी केलं, तेच तिथे झालं. तेच मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या बाबतीत केलं. गोव्यातही भाजपाचं बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतलं. ही एक नवीन पद्धत साधन संपत्तीचा वापर करून राबवली जात आहे. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे फोडाफोडीची, खोक्यांचं राजकारण लोकांना पसंत नाही. याचं उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसलं आहे, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – कर्नाटकातील निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचा हनुमान चालिसा ट्वीट करत भाजपाला खोचक टोला!

यश-अपयश समजू शरतो. पण कर्नाटकात भाजपाचा सपशेल पराभव करण्याची भूमिका तिथल्या जनतेनं घेतली होती. मी कर्नाटकच्या जनतेचं आणि काँग्रेसचं अभिनंदन करतो. त्यांनी भाजपाला धडा शिकवला आता ही प्रक्रिया देशभरात होईल. आता केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रेदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं राज्य नाही. त्यामुळे बहुसंख्य राज्यात भाजपा सत्तेच्या बाहेर आहे. २०२४ च्या निवडणुकीत काय चित्र दिसणार आहे, याचा एक अंदाज कर्नाटकच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकतो, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

धर्म आणि जात याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळी त्यांच्यात यश येतं. पण लोकांना हे आवडत नाही. बजरंग बली की जयचा मुद्दा निवडणुकीत काढण्याचं कारण नव्हतं. धर्मनिरपेक्षतेवर निष्ठा असल्याची शपथ आम्ही संसदेत घेतली. पण अशी शपथ घेतलेल्या एका महत्वाच्या व्यक्तीनं अशी घोषणा करणं शोभत नाही. ते काम त्यांनी केलं. त्यांची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे, असं शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button