breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन पाण्याची तपासणी करा – आयुक्त हर्डिकर

पिंपरी – महापालिका मुख्य इमारतीतील दोन्ही पाण्याच्या टाक्यांमध्ये दुषीत पाणी आढळून आले आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चर आॅडीट करुन पाण्याचे नमुने लॅबमध्ये तपासणीस पाठवून त्याचा अहवाल सात दिवसात देण्यात यावा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

महापालिका मुख्य इमारतीत दुषित पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी महापालिका आयुक्तांना विरोधी पक्षनेत्यांनी ते दुषित पाणी प्यावे, असा आग्रह करुन संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. तसेच ते म्हणाले की, दोन्ही टाक्यांमध्ये साठलेल्या पाण्याची दुर्गंधी येत होती. त्यामुळे ते पाणी संकलीत करून परिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. पाण्यातील पंप गंजलेले आहेत. टाक्या शेवळलेल्या आहेत. दोन महिन्यानंतर दोन्ही टाक्या साफ केल्या जात असल्याचा खुलासा स्थापत्य विभागाने केला आहे. परंतु, सात ते आठ महिने झाले असतील टाक्या साफ केल्या नाहीत, असा आरोप साने यांनी केला आहे. महापालिकेत सामान्य नागरिक येतात. अधिकारी, पदाधिकारी असतात. त्यांना दुषीत पाणी पाजले जात आहे. त्यामुळे या पाण्याचे परिक्षण करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत स्थापत्य विभागाला दोन्ही टाक्याचे स्ट्रक्चरल आॅडीट करावे, तर पाण्याच्या टाक्यांची योग्य ती स्वच्छता करण्यात यावी, त्याशिवाय पाण्याचे पाणी लॅबला तपासणीला पाठवून त्यांचा रिपोर्ट सादर करावा, यांची सर्वस्वी जबाबदारी आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांना देवून त्यांनी पाठपुरावा करावा, असे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button