breaking-newsताज्या घडामोडीपुणे

फर्ग्युसनमध्ये ‘मी सावरकर’ला विरोध, पुरोगामी विद्यार्थ्यांची शरद पोंक्षे यांच्या विरोधात घोषणाबाजी

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेत पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी चांगलाच वाद घातला. वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपाला आलेले अभिनेते शरद पोंक्षे यांना पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या विरोधाचा सामना करत गुपचूप दुस-या मार्गाने सभागृहात पोहोचावे लागले. दरम्यान, पोंक्षे यांना विद्यार्थी संघटनांच्या रोषाला बळी पडावं लागलं.

‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपासाठी पोंक्षे फर्ग्युसन कॉलेजमध्ये येणार हे कळताच पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी तिव्र विरोध केला होता. पोंक्षे याठिकाणी येताच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. त्यावर अभाविपकडूनही घोषणाबाजी करून प्रत्युत्तर देण्यात आलं.

कार्यक्रमापूर्वी पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचं समर्थन करणाऱ्या शरद पोक्षेंचा जाहीर निषेध, असे पोस्टर यावेळी विद्यार्थ्यांनी झळकावले. त्यामुळे कॉलेज परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. नंतर, पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरु करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button