breaking-newsराष्ट्रिय

केंद्र सरकार खासगी रेल्वे चालकांना स्थानक निवडण्याचे स्वातंत्र्य देणार

नवी दिल्ली – देशातील खासगी रेल्वे चालकांना हव्या त्या स्थानकावर थांबण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने प्रसिद्ध केली आहे. तसेच देशात १५० खासगी रेल्वे गाड्या देशभरातील १०९ मार्गांवर चालवण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी खासगी ऑपरेटर्सना प्रवासाआधी रेल्वेमार्गावरील थांब्यांची यादी सादर करावी लागणार आहे.

खासगी रेल्वे चालकांना रेल्वे स्थानकांवर थांबण्याची आणि निघण्याची वेळही सांगावी लागणार आहे. किमान वर्षभरासाठीचे प्लॅनिंग रेल्वे प्रशासनाला द्यावे लागणार आहे. तशा प्रकारचा अहवाल खासगी रेल्वे गाड्यांना सादर करावा लागणार आहे. सवलतीच्या कराराच्या अटी व शर्तींच्या अनुषंगाने थांबे/थांब्यांचे निर्णय घेण्यास खासगी रेल्वे प्रशासनाला स्वातंत्र्य देण्यात आले आहे. असे रेल्वेने अर्ज-पूर्व बैठकीस उपस्थित असलेल्या एका खासगी रेल्वे प्रतिनिधीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

रेल्वेने असेही म्हटले आहे की, जलद गती रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार नाही. खासगी गाड्यांच्या अशा प्रकारच्या थांब्यांची संख्या त्या मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वेच्या जलद गती रेल्वे गाड्यांच्या थांब्यांपेक्षा जास्त असणार नाहीत. खासगी ऑपरेटरने सादर केलेल्या रेल्वे ऑपरेशन योजनेत ज्या स्थानकांवर गाड्यांमधील पाण्याची टाकी भरण्याची गरज तसेच रेल्वे स्थानक, वॉशिंग लाईन्स किंवा स्टॅबलिंग लाईन्स, ट्रेनची स्वच्छतागृहांचादेखील समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button