breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमुंबई

UPSC: ४ वर्षाच्या मुलाला सांभाळत ती देशात दुसरी

नवी दिल्लीः  हरियाणाच्या सोनेपत जिल्ह्यातील अनु कुमारीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. काल (शुक्रवारी) आयोगाने निकाल जाहीर केला. या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अनु कुमारीचे लग्न झाले असून तिला ४ वर्षांचा मुलगाही आहे.

दिल्ली विद्यापीठातून तिने भौतिकशास्त्र (हॉनर्स) विषयातून पदवी घेतली. त्यानंतर तिने  आयएमटी नागपूर येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. अनु गेल्या ९ वर्षांपासून नोकरी करते. लग्न, नोकरी आणि मुलाला सांभाळत तिने यूपीएसी पास होण्याचे स्वप्न साकार केले आहे.

माझी नोकरी चांगली होती मात्र, त्याकामातून मला मानसिक समाधान मिळत नव्हते. एकावेळी ते काम एवढे यांत्रिक बनले की, ते मला करता येणे शक्य होईनासे झाले. त्यामुळे ते काम सोडून समाजासाठी काहीतरी करण्यासाठी या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला, असे ती म्हणाली. एका खासगी विमा कंपनीतील नोकरी सोडून दोन वर्ष तिने फक्त अभ्यासाठी दिली आणि जोमाने या परीक्षेची तयारी केली. २०१६ मध्ये झालेली पूर्व परीक्षा तिने दोन महिने अभ्यास करून दिली होती, त्यावेळी केवळ १ गुणाने नापास झाली होती.

दुसऱ्या प्रयत्ना मी ही परीक्षा पास झाले, माझ्याकडे अजून एक शेवटचा अटेंम्ट होता. पण यावेळी माझ्यावर दडपण आले असेत, याची मला जाणीव होती, त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात परीक्षेत यश मिळवण्याचा ध्यास घेतला होत, असे तिने सांगितले. ती पुढे म्हणाली की, भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची आता मला संधी मिळणार आहे. महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात काम करण्याचे माझे उद्दिष्ट असणार आहे. त्यांच्या जीवनात चांगला बदल घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. आमच्या हरियाणामध्ये खूप सामाजिक समस्या आहेत, हरियाणा प्रतिगामी स्वरूपाचा म्हणून ओळखला जात आहे. महिलांच्यावर अत्याचाराचे प्रमाण मोठे आहे. महिलांच्या समस्यांवर काम करण्याची या निमित्ताने मला संधी मिळाल्याने मी खूप खुश आहे.

परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली की, मी माझ्या ध्येयावर नेहमी लक्ष केंद्रित ठेवत होते, कोणत्याही परिस्थितीत लक्ष विचलित होऊ दिले नाही. यासाठी मी कोणताही कोचिंग क्लास वैगेरे लावला नव्हता, सर्व तयारी स्व:त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button