breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुंबई पुण्यासह राज्यातील काही भागात आजही पाऊस पडणार

पुणे – ईशान्य अरबी समुद्राच्या दक्षिण गुजरात – उत्तर कोकण किनारपट्टीलगत चक्रीय चक्रवात आहे. याचा परिणाम म्हणून आज, शुक्रवारीदेखील मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या चोवीस तासात कोकण गोव्यात ब-याच ठिकाणी पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण गोवा व मराठवाड्यात ब-याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

पुणे शहर आणि उपनगरांत बुधवारप्रमाणे गुरुवारीदेखील ओलाव्यामुळे धुके निदर्शनास आले असून, शुक्रवारीदेखील येथे धुक्याची चादर कायम राहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही धुके जाणवू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला.

या जिल्ह्यांत पाऊस
३ डिसेंबर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद.
४ डिसेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button