breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

प्रभू श्री राम तुमची मालमत्ता आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

राम मंदिर : अयोध्येतील प्रभू श्री राम भव्य मंदिर जवळपास तयार झाले आहे. २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री राम अभिषेक होणार आहे. या दिवशी देशभरातील लोकांना राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावरून वक्तव्य केलं आहे. मीरा भाईंदर येथील गोवर्धन पूजा समारोह सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निकाल सर्वांसमोर आहेत. पण, मध्य प्रदेशात प्रचारावेळी अमित शाहांनी म्हटलं की, आम्हाला मतदान करा, तुम्हाला प्रभू श्री रामाचे दर्शन मोफत घडवू. प्रभू श्री राम तुमची मालमत्ता आहे का?

हेही वाचा – धक्कादायक! देशात गेल्या २४ तासांत ६५६ नवीन कोरोना रूग्णांची नोंद

तुम्हाला वाटतं ‘जय श्री राम’ आणि ‘बजरंगबली की जय’ म्हटल्यानं सगळे हिंदू तुमच्याबरोबर येतील. मात्र, शिवसेना आणि भाजपाच्या हिंदुत्वात हाच फरक आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईतील उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत. मुंबईतील लोकांनी तिकडे जायचं का? ‘गुजरातची प्रगती झाली, तर देशाची प्रगती होईल,’ असं पंतप्रधान म्हणतात. मग, महाराष्ट्राची प्रगती झाली, तर देशाची प्रगती होत नाही का? गुजरातची प्रगती करण्यासाठी आमचं हिसकावून घेऊन जाऊ नका, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं आहे.

आजपर्यंत ज्यांना आपलं समजलं, तेच आता शत्रू बनून समोर उभे राहिलेत. आपलं धनुष्यबाणही चोरलं आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यावर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button