breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नरवीर तानाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांचे समाधीस्थळ उपेक्षित

रायगड – सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे सिंहगड सर करण्यामध्ये तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर गड सर करण्यात मोलाचे योगदान देणारे तानाजी मालुसरे यांचे बंधु सूर्याजी मालुसरे यांचे समाधीस्थळ पोलादपूर तालुक्यातील साखर याठिकाणी असून त्याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्षित पणा होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात वसलेले साखर गाव याठिकाणी तानाजी मालुसरे यांचे बंधु सूर्याजी मालुसरे व त्यांच्या पत्नी सती यांचे समाधीस्थळ आहे. याठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे सती यांच्या समाधीस्थळ येथे असलेले पिंपळाचे झाड अनेकदा तोडूनही पुन्हा पून्हा निर्माण होत असते त्यामुळे या समाधीला जिवंत समाधी मानले जाते. मात्र याठिकाणी जाणारा रस्ता बिकट असून समाधीस्थळ परिसरात गवताचा वेडा निर्माण झाला आहे.

तानाजी चित्रपटानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ या समाधीस्थळी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे व त्यातील काही पर्यटक सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी सुद्धा जाऊ लागले आहेत मात्र याठिकाणी पुर्णपणे असुविधा असल्याचे पाहायला मिळत आहे व येणारे पर्यटक इतिहास प्रेमी नाराज होत आहेत.इतिहासकाळातील महत्वाचा दुवा असणारी ही महत्वाची स्थळे शासनाने जतन करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत व इतिहास प्रेमींना अमूल्य असा ऐतिहासिक वारसा जपायला हवा अशी इतिहास प्रेमींची मागणी आहे.उमरठ येथे येणाऱ्या शिवप्रेमींना तानाजी यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ देखील पाहता यावे व तेथे सुद्धा सोयी सुविधा मिळाव्या अशी मागणी होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button