breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#IPL2021 पृथ्वी-धवनचं धडाकेबाज अर्धशतक; दिल्लीचा चेन्नईवर शानदार विजय

मुंबई   – आयपीएल २०२१ मध्ये काल महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर वानखेडे स्टेडियमवर रंगला. या सामन्यात दिल्लीने बलाढ्य चेन्नईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 14व्या मोसमाची दमदार सुरुवात केली.

चेन्नईच्या संघाने दिल्लीपुढे १८९ धावांचे दमदार आव्हान ठेवले होते. हे आव्हान दिल्लीने 3 विकेट्सच्या बदल्यात 18.4 षटकांमध्ये पूर्ण केले. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 85 धावा केल्या. तर पृथ्वी शॉने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दोघांनी दिल्लीसाठी 138 धावांची सलामी भागीदारी केली. तर चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 2 आणि ड्वेन ब्राव्होने 1 विकेट घेतली.

चेन्नईने दिलेले 189 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईला जोरदार प्रत्युत्तर दिले. दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज अर्धशतक झळकावत विजयाचा पाया रचला. शॉने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होतात. तर शिखरने 54 चेंडूत 85 धावा फटकावल्या. त्यात 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. तर या सामन्यात चेन्नईचे सरसकट सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. शार्दुल ठाकूरला दोन विकेट्स मिळाल्या खऱ्या परंतु त्याने 3.4 षटकात तब्बल 53 धावा मोजल्या. तर ड्र्वेन ब्राव्होने 4 षटकात 28 धावा देत 1 विकेट मिळवली. या व्यतिरिक्त उर्वरीत कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने ब्राव्होव्यतिरिक्त चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button