breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35,19,208 वर

  •  मुंबईत 7,873, पुण्यात 10,019 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात मंगळवारी नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. काल दिवसभरात महाराष्ट्रात 60,212 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 281 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 31,624 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 35,19,208 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 58,526 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 28,66,097 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 5,93,042 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 7,873 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 8,804 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 5,35,264 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 12,093 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 435,953 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे आणि सध्या 86,098 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 10,019 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6,71,426 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 8,682 इतका झाला आहे. दरम्यान, पुण्यात आतापर्यंत 5,44,576 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 1,18,168 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button