breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 वर

  • मुंबईत 9,327, पुण्यात 9,864 नवे रुग्ण[clear]

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात शनिवारी नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. काल दिवसभरात महाराष्ट्रात 55,411 नव्या रुग्णांची नोंद झाली[clear], तर 309 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 53,005 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 33,43,951 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 57,638 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 27,48,153 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 5,36,682 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 9,327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 50 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 8,474 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 5,10,225 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,959 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 4,06,087 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या 91,108 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात शनिवारी तब्बल 9,864 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6,36,016 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 82 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 10,623 इतका झाला आहे. तसेच काल 7,030 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 5,31,098 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 94,464 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button