breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बदलापुर : केमिकल कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

ठाणे | महाईन्यूज

बदलापूर एमआयडीसीमधील के. जे. रेमेडीज या केमिकल कंपनीत ड्रायरचा स्फोट होऊन एक कामगार मृत्यू पावला आहे. तर, दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. आगीमुळे कंपनीतील बरेच सामान जळून खाक झाले.

आज सकाळी (दि. 22) नऊ वाजता के. जे. रेमेडीज या केमिकल कंपनीत ड्रायरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज आला. दरम्यान, या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी कंपनीत अडकलेल्यांना बाहेर काढले. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले. दोघांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button