breaking-newsआंतरराष्टीय

कॅलिफोर्निया बदामांवरील वाढीव कर मागे घेण्याची मागणी

  • पॉम्पिओ यांनी प्रयत्न करण्याची अमेरिकी काँग्रेस सदस्यांची सूचना

कॅलिफोर्निया बदामांवर लावण्यात आलेला कर मागे घेण्यासाठी भारत दौऱ्यावर जाणारे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी  प्रयत्न करावेत, असे आवाहन अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमेवत भेटीवेळी कॅलिफोर्निया बदामांवर कर वाढवल्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

भारताने अमेरिकेच्या एकूण २८ उत्पादनांवर आयात कर ५० टक्के वाढवला असून त्यात वॉशिंग्टन सफरचंद, कॅलिफोर्निया बदाम, डाळी, अक्रोड यांचा समावेश आहे. अमेरिकेने भारताच्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर २५ टक्के कर लादला होता. याशिवाय भारताला दिलेला जीएसपी दर्जा अमेरिकेने काढून घेतल्यामुळेही बदामांवरचा कर वाढवण्यात आला.

व्यापार मंत्रालयाने गेल्या आठवडय़ात असे म्हटले होते,की अमेरिकी उत्पादनांवर कर वाढवण्याचा प्रस्ताव अमेरिकेबरोबर व्यापार करार होत नाही तोपर्यंत स्थगित ठेवण्यात येईल. अमेरिकी काँग्रेस सदस्य जोश हार्डर यांनी पॉम्पिओ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे,की अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे बदाम भारतात निर्यात केले जातात. त्यावरचा वाढीव आयात कर रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कॅलिफोर्नियाच्या बदामांवर भारताने लादलेला कर हा अमेरिकेच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला जाचक आहे. त्यामुळे भारतीय पंतप्रधानांशी भेटीत हा मुद्दा मांडण्यात यावा.

पॉम्पिओ हे २५ ते २७ जून दरम्यान  भारतात येत असून अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी २० देशांच्या बैठकीवेळी ओसाका येथे भेट होणार आहे.  अलमंड अलायन्स ऑफ कॅलिफोर्नियाचे अध्यक्ष एलेनी ट्रेव्हिनो म्हणाले की, कॅलिफोर्निया बदामांसाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. भारतात मोठय़ा प्रमाणात बदामांची निर्यात केली जाते. चीनबरोबरच्या व्यापार वादामुळे या निर्यातीला आणखी महत्त्व आहे. आमचा जिल्हा अमेरिकेतील सर्वात जास्त बदाम उत्पादन करणारा आहे. अमेरिकी बदामांवर भारताने लादलेला कर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

भारताला सर्वाधिक बदाम निर्यात

कॅलिफोर्नियातून भारताला सर्वाधिक बदाम निर्यात होतात. वर्षांला एकूण ६५० दशलक्ष डॉलर्सची बदाम निर्यात होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button