TOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

संस्कार देण्यात कमी पडत असल्याने वृद्धाश्रमांच्या संख्येत वाढ- खासदार बारणे

पिंपरी (प्रतिनिधी) पालक आपल्या मुलांना काबाडकष्ट करून मोठे करतात चांगली नोकरी लावतात. मात्र जोडीदार आल्यावर मुले बदलतात.
आई वडीलांना बेदखल करून त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे. संस्कार देण्यास आपण कुठेतरी कमी पडत असल्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे.यासाठी पालकांनो तुमच्या मुलांच्या नावावर संपत्ती करू नका.असा सल्ला खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड येथे दिला.

महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने हभप साखरचंद महाराज लोखंडे यांना संत सावता भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी दहावी बारावीतील ९३ यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डॉ. लक्ष्मण गोफणे,माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे,कांतीलाल भूमकर, मोहन भूमकर, माजी नगरसेविका रेखा दर्शले, संगीता ताम्हाणे,केंब्रिज विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, चेतन भुजबळ, शीतल वर्णेकर, आनंदा कुदळे,सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी,उद्योजक संजय जगताप ,दिशा सोशल फोंडेशनचे कार्याध्यक्ष राजेश कर्पे, वंदना जाधव, प्रकाश जमदाडे,काळुराम गायकवाड, प्रशांत डोके, चंद्रकांत वाघोले,माळी समाज मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

खा. बारणे पुढे म्हणाले कि,भारताची संस्कारमय देश म्हणून जगात ओळख आहे. आपण संस्कारापासून दूर जातोय कि काय यावर चिंतन करण्याची गरज आहे. तुमच्या हाती जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत मुले गोड बोलतील. मुलांवर अजिबात विश्वास ठेवू नका.जोडीदार आल्यावर रंग दाखवतात. यासाठी तुम्ही आयुष्यभर कमवलेला पैसा तुमच्याजवळ बाळगून ठेवा जेणेकरून मुले तुमच्याकडे लक्ष देतील.मात्र आजच्या तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजेत भविष्यात तुम्ही देखील वृद्धावस्थेत जाणार आहेत. यामुळे कसे वागायचे ते तुम्हीच ठरवा.
डॉ गोफणे म्हणाले कि,ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते.जगात अशक्य काहीच नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर झोपडपट्टीत राहून देखील माझ्यासारखा डॉक्टर घडू शकतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत माळी केले.
सूत्रसंचालन ऋतुजा चव्हाण तर आभार अमर ताजणे यांनी मानले.
यावेळी आप्पासाहेब बोराटे ,बाळासाहेब बांगर निर्मित महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारीत “सत्यशोधक” या चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात आला.
विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे डॉ. वर्णेकर यांच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रमाचे नंतर अमर ताजणे, समीता गोरे,आप्पा बोराटे, प्रशांत डोके यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीहरी हरळे , प्रकाश गोरे ,अशोक टिळेकर, विश्वास राऊत ,अनिल साळुंके ,नितीन ताजने, विजय दर्शले. राजेंद्र बरके, महादेव भुजबळ, शंकर भुजबळ, वैजनाथ माळी ,अमर ताजणे, हरेश शिंदे,कैलास पेरकर, नवनाथ कुदळे,प्रदीप दर्शले,निलेश डोके,नरहरी शेवते, सोमनाथ शिरसकर,दिलीप भोसले,प्रमोद माळी, विलास शेंडे, परेश ताम्हाणे,किशोर माळी, कौशल माळी, निखिल यादव,बाबासाहेब पिंगळे,रमेश गायकवाड,गोरक्ष गोरे, महिला सखी मंचच्या महिला अनिता ताटे, स्मिता माळी, अलका ताम्हणे, नेहा भुजबळ, आशा माळी, उर्मिला भुजबळ, कुंदा यादव या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button