breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सांगलीत बड्या साखर व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे

सांगली | प्रतिनिधी
शहरातील एका सर्वांत बड्या साखर व्यापाऱ्यावर काल आयकर विभागाने छापे मारले. या छप्यात आयकर विभागाने महत्वाच्या कागदपात्रांसह मोठी रक्कम ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करण्यासाठी सांगलीसह पुणे, कोल्हापूर आणि कर्नाटकमधील पथकांना आयकर विभागाने पाचारण केले होते. दरम्यान, याबाबत आयकर विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. मात्र आयकर विभागाच्या या छाप्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या व्यापाऱ्याच्या निवास स्थानासह मार्केट यार्ड परिसरातील दुकानांवरही छापे टाकण्यात आले आहेत. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आयकर विभागाकडून याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. छापा टाकण्यात आलेला व्यापारी सह्याद्रीनगर परिसरात राहत असून, मार्केट यार्ड परिसरात त्यांचा मोठा साखरेचा व्यापार आहे. काल आयकर विभागाची पथके सांगली शहरात दाखल झाली होती. तेव्हापासून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

या छाप्यात एक आलीशान गाडी, मोठी रक्कम आणि काही महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार सांगली मार्केट यार्ड परिसरात छापे टाकण्यात आले. या व्यापाऱ्यासह अन्य काही ठिकाणीहीही छापे टाकण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button