breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘पहाटेचा शपथविधी संदर्भात शरद पवार यांना माहिती होती’; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांनी आमच्यासोबत विश्वासघात केला

मला तुरूंगात टाकण्यासाठी पोलीस आयुक्तांना सुपारी दिली

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटे घेतलेल्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१९ मध्ये आम्ही पहाटे घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती होती, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

२०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण ऐनवेळी आमच्यासोबत विश्वासघात करण्यात आला. माझ्यासोबत २ वेळा विश्वासघात झाला पहिला विश्वासघात उद्धवजींनी केला आणि नंतर शरद पवार साहेबांनी केला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार मला तुरूंगात टाकू शकले नसते, पण त्यांनी मला तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला तुरूंगात टाकण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी दिली होती. मी कधीही पोलीस विभागाला अपमानीत केल नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच माझ्याबाबतीत प्रेम होते, त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नांची मला माहिती मिळायची. त्यांनी मला तुरूंगात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button