breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महिला रंगल्या पैठणीच्या रंगात ; विनायक आबा मोरेंच्या कार्यक्रमाला दमदार प्रतिसाद

  •  विनायक आबा मोरे स्पोर्ट्स फाउंडेशनचा पुढाकार
  •  श्रीराम वरदायिनी सखी मंचतर्फे ‘खेळ रंगला पैठणीचा’

पिंपरी l प्रतिनिधी

उखाणे, कोपरखळ्या, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आणि सोबत मानाची पैठणी अशा रंगारंग कार्यक्रमांमध्ये चिखली परिसरातील महिला रंगून गेल्या. निमित्त होते विनायक (आबा) मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि श्रीराम वरदायिनी सखी मंच यांच्या माध्यमातून आयोजित ‘न्यू होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे. सामाजिक कार्यकर्ते विनायक (आबा) मोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

विनायक आबा मोरे यांनी महिला भगिनींची सोय लक्षात घेऊन सोसायटी निहाय या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमादरम्यान विठ्ठल- रुक्मिणी हौऊसिंग सोसायटी, नारायण हौऊसिंग सोसायटी परिसरातील महिलांना मनोरंजनाची पर्वणी मिळाली. परिसरातील पुरुष व महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सोसायटीतील महिलांनी कार्यक्रम अक्षरश: हाउसफूल्ल केला.

या कार्यक्रमात प्रथम पारितोषिक पैठणी साडी, द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ, तृतीय पारितोषिक जोडवी, चौथे पारितोषिक गॅस शेगडी, उत्तेजनार्थ पारितोषिक मिक्सर, कुकर, इस्त्री, पोळी डबा, तवा, टिफिन बॅग आणि इतर अनेक वस्तू देण्यात आल्या. खेळाचा आनंद घेत घरगुती वापराच्या उपयोगी वस्तू मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

  • महिला म्हणाल्या आम्ही होणार बदलाचे साक्षीदार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत विनायक आबा यांच्यासारखे चांगले प्रतिनिधी निवडून देण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे मनोगत यावेळी महिला भगिनींनी व्यक्त केले. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आम्हीच महापालिकेत तुम्हाला निवडून देऊन बदलाचे साक्षीदार होणार आहोत, असा संकल्प या वेळी या महिलांनी सोडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button