पिंपरी / चिंचवड

शाहुनगर- संभाजीनगर येथे आधार महिला मंडळाच्या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा उपाध्यक्षा सुप्रिया  चांदगुडे यांना निवडून देण्यासाठी महिलांनी कसली कंबर

प्रभाग क्रमांक १५ मधील महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रमात निर्धार

पिंपरी l प्रतिनिधी

कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठाण व आधार महिला मंडळ आयोजित फुलेनगर येथे हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. आगामी महापालिका निवडणुकीत सुप्रिया चांदगुडे यांना नगरसेवक म्हणून निवडून देण्यासाठी महिलांनी कंबर कसली असल्याचे चित्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर आले आहे.

हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली. कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठाण व आधार महिला मंडळ यांच्या वतीने अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते.

जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून सुप्रिया चांदगुडे काम करत आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी त्या वेळोवेळी प्रयत्नशील असतात. त्यामुळेच शाहूनगर, पूर्णानगर, महात्मा फुलेनगर, लालटोपी नगर आणि परिसरातील नागरिक व महिलांनी सुप्रिया चांदगुडे यांना आगमी निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून देण्याचे ठरवले असल्याचे चर्चा सुरु आहे.

निवडणुका येतात-जातात. मात्र ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यांच्या अडचणी सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. समाजाचे, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करणार आहे. असल्याचे सुप्रिया चांदगुडे म्हणाल्या. महिलांनी हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली, त्याबद्दल त्यांचे आभार देखील सुप्रिया चांदगुडे यांनी व्यक्त केले.

रक्तदान शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद…

शाहूनगर येथे कै. कैलासभाऊ चांदगुडे यांच्या पुण्यस्मराणनिमित्त कैलासभाऊ चांदगुडे प्रतिषठानच्या वतीने आणि मोरया ब्लड बँकच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये ११४ लोकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी नगरसेवक आणि उद्योजक महेश चांदगुडे. भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे यांच्या हस्ते झाले. सदर उद्घघाटन प्रसंगी भगवन मुळे, नवनाथ पवार, भगवान गोडसे, बाळासाहेब जगताप, श्रीमंत कदम, तुकाराम जाधव, स्वाती गायकवाड, मीनल दीक्षित, स्वाती शहाणे, अंजली रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button