पिंपरी / चिंचवड

कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात 114 पिशव्यांचे रक्तसंकलन

पिंपरी l प्रतिनिधी

कै. कैलासभाऊ चांदगुडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान आणि मोरया ब्लड बँक यांच्या वतीने शाहूनगर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात तब्बल 114 पिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.

माजी नगरसेवक, उद्योजक महेश चांदगुडे, भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी भगवन मुळे, नवनाथ पवार, भगवान गोडसे, बाळासाहेब जगताप, श्रीमंत कदम, श्री. जाधव, साबळे काका, तावरे काका, तुकाराम जाधव. श्रीमती शिंदे, सौ. जगताप, सौ. ठेगे, स्वाती गायकवाड, मीनल दीक्षित, सौ. कुटे, स्वाती शहाणे, अंजली रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते.

रविवारी (दि. 13) शाहूनगर येथे हे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिराला रक्त दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. शिबिरामध्ये 114 नागरिकांनी रक्तदान केले. शहरात काही वेळेला रक्ताचा तुटवडा पडतो. रक्तदान हे जीवनदान आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करायला हवे, असे मत सुप्रिया चांदगुडे यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button