Uncategorizedताज्या घडामोडी

नदीवरील पुलाअभावी त्र्यंबकेश्वरमधील सावरपाडा गावातील महिलांना जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार; मुख्यमंत्री शिंदे सावरपाड्याला भेट देण्याची शक्यता

नाशिकः तास नदीवरील पुलाअभावी त्र्यंबकेश्वरमधील सावरपाडा गावातील महिलांना जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार अलीकडेच पुढे आला आहे. जिल्हा दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावरपाड्याला भेट देण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनापुढील पेच वाढला आहे. सावरपाड्याकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला असून, मुख्यमंत्र्यांचे वाहन तेथे पोहोचणार कसे, याची चिंता प्रशासनाला सतावते आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार (दि. ३०) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप अधिकृत दौरा प्राप्त झाला नसला तरी ते नाशिकसह, मालेगाव आणि मनमाड येथेही जाणार असल्याचे गृहीत धरून जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचा हा पहिलाच जिल्हा दौरा असून, जिल्हा प्रशासनासह सर्वच सरकारी यंत्रणा तयारीला लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दोनच दिवसांपूर्वी आढावा बैठकही घेतली. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची शिंदे हे मालेगावात बैठक घेणार असून, तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते मनमाडला जाणार आहेत. तेथून मुक्कामासाठी ते औरंगाबादला जाणार असल्याच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा प्रशासन दौऱ्याचे नियोजन करते आहे. परंतु, ते सावरपाड्यालाही भेट देणार असल्याची माहिती आज मिळाल्याने, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ताफा पोहचणार कसा?

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्यावरील अधिकारी मंगेश चिवटे सावरपाडा येथील परिस्थितीची पाहणी करून गेले. त्यानंतर तातडीने पुलाचे काम मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. चिवटे यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मुख्यमंत्री सावरपाड्याला भेट देण्याची शक्यता असून, तशी तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. परंतु, पावसामुळे हरसूलकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. सावरपाड्याकडे जाणाऱ्या दोन किलोमीटर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. मोटरसायकलपासून ट्रॅक्टरपर्यंतचे कोणतेच वाहन या रस्त्यावरून जाऊ शकत नाही. रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी अवधीही हाती नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा सावरपाड्यापर्यंत कसा पोहाचणार, याची चिंता प्रशासनाला सतावते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button