breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शाळांपुढे समस्यांचा डोंगर, मुलभूत सोयी-सुविधा देण्याची होतेय मागणी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये समस्याचा डोंगर आहे. मुलभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होवू लागली आहे. त्याकडे सत्ताधारी भाजपच्या कारभा-यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यात विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण समिती सभापतींना पत्र पाठवून शाळांमधील अडचणी सोडवण्यात याव्यात, अशा मागण्यां केल्या आहे.

शहरात महानगरपालिकेच्या 120 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा आहेत. त्या शाळांमध्ये कष्टकरी, कामगार, मजूरासह मध्यमवर्गीय कुटूंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांकडे गेल्या अडीच वर्षात तेथील नगरसेवक, स्थानिक आमदारांसह शिक्षण समितीच्या तत्कालिन सभापतींनी दुर्लक्ष केल्याने अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

महापालिकेचे माजी महापाैर राहूल जाधव यांनी त्याच्या कार्यकाळात प्राथमिक व माध्यमिक शाळांचा दाैरे केले. तेथील अडी-अडचणी जाणून घेतल्या. मात्र, त्या समस्या सोडवण्यास त्यांना म्हणावे तितके यश आले नाही. त्यात शिक्षण समित्यांचे सभापतींनी देखील त्या समस्याकडे डोळेझाक केली. त्यामुळे विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण समितींकडे पत्र पाठवून आमच्या अडीअडचणीकडे लक्ष देण्याची मागणी केल्या आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या शाळांमध्ये विविध अडचणी आहेत. त्यात चार शाळांना इमारत बांधून हवीय, दोन शाळांमध्ये पाण्याची सोय नाही. दहा शाळांच्या सुरक्षा भितीं बांधाव्यात, 27 शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत, 8 शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही नाहीत. 16 शाळांना अग्नीशमन यंत्रणेची गरज आहे. 11 शाळांना रॅम्प बांधून हवाय, 8 शाळांना मुलीसाठी स्वच्छतागृहे हवीय, 2 शाळांना ग्रंथालय पाहिजे. 64 शाळांना रंगरंगोटी करण्याची गरज आहे. तर 21 शाळांना फर्निचर हवंय आणि 9 शाळांना विद्युत विषयक कामकाज करुन पाहिजे. अशा प्रकारे विविध शाळांनी शिक्षण समितीकडे पत्र पाठवून समस्यांचा डोंगर मांडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button