breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सचिन वाझेंना अटक करण्याची फडणवीसांची मागणी; वाझे म्हणाले…

मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यावेळी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची देखील मागणी केली. विधानसभेत बोलताना मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांची तक्रार देखील वाचून दाखवली. हा राजकारणचा विषय नाही पण थेट पुरावे असतानाही वाझेंना अटक होत नसेल तर कोण आणि कशासाठी वाचवत आहे ? असा प्रश्न देखील त्यांनी केला.

वाचा :-हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला, फडणवीसांचा आरोप

फडणवीसांच्या आरोपानंतर आता सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. वाझे म्हणाले की, माझ्यावरच्या आरोपांबाबत मला अजून काहीही माहिती नाही. नेमके आरोप काय आहेत हे कळल्यानंतरच मी माझं मत मांडेन.मनसुख हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं किंवा नसणं यामध्ये काय गुन्हा आहे? गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा आहे का? यात नेमका आरोप काय? असा प्रतिसवाल देखील वाझेंनी उपस्थित केला.मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांची तक्रार फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली होती. याबाबत विचारले असता, वाझे म्हणाले की, त्यांचा जबाब मी वाचलेला नाही. त्यांचा जबाब मी अगोदर वाचतो आणि मग यावर उत्तर देतो.

दरम्यान, विधानसभेत फडणवीसांनी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले. सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी देखील भाजपने केली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button