breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शालेय विद्यार्थ्यांसाठी 6 लाख 39 हजार 594 पुस्तकांच्या प्रती उपलब्ध

पिंपरी, (महाईन्यूज) – समग्र शिक्षाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मनपा आणि खासगी अनुदानीत शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे  यांनी सर्व प्राथमिक शाळांना दिले आहेत.

शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन केले आहे. 3 जून ते 11 जून दरम्यान पाठ्यपुस्तके वाटप केली जाणार आहेत. आकुर्डी येथील वसंतदादा प्राथमिक मनपा शाळा आणि पिंपरी शहर साधन केंद्र अंतर्गत भाऊराव पाटील मनपा शाळा याठिकाणी पाठ्यपुस्तकांची वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यार्थी संख्येनुसार 6 लाख 39 हजार 597 पुस्तकांच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

शाळा प्रवेश पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या-त्या भागातील स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप केले जाणार आहे. बालभारती पुणे यांच्याकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, सेमी इंग्रजी, उर्दू अशा माध्यमनिहाय पुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. अपंग समावेशित शिक्षणांतर्गत अल्पदृष्टी विद्यार्थ्यांनाही लार्ज प्रिंट पुस्तके वाटप करण्यात येणार आहे.

माध्यमनिहाय विद्यार्थी संख्या

मराठी – 1 लाख 639

हिंदी – 3 हजार 518

उर्दु- 4 हजार 44

इंग्रजी- 5 हजार 506

सेमी इंग्रजी – 21 हजार 721

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button