पिंपरी / चिंचवड

दुकानातील कामगाराने केली 76 हजारांची चोरी

पिंपरी l प्रतिनिधी

दुकानात काम करणा-या कामगाराने दुकानात 76 हजार 960 रुपयांची चोरी केली आणि निघून गेला. ही घटना 24 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत थेरगाव येथे घडली.

यशपाल हिरालाल चौधरी (वय 41, रा. डांगेचौक, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेवाचंद सतार (रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे डांगे चौक येथे उत्तम इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. आरोपी रेवाचंद हा फिर्यादी यांच्या दुकानात सन 2012 पासून काम करत होता. फिर्यादीची नजर चुकवून आरोपीने ग्राहक विजय पवार यांना दिलेल्या इलेक्ट्रिक मालाचे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर्स यांना देण्यासाठी दिलेले 40 हजार रुपये व दुकानाच्या गल्ल्यातील 36 हजार 960 रुपये असे एकूण 76 हजार 960 रुपये घेऊन रेवाचंद पळून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button