पिंपरी / चिंचवड

रस्त्यात अडवून महिलेचा विनयभंग ; आरोपीला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

रस्त्याने जाणा-या महिलेजवळ येऊन तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना 10 मार्च आणि 25 एप्रिल रोजी विशालनगर येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

इम्रान खान (वय 30, रा. विशालनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा वेळोवेळी पाठलाग केला. 25-26 मार्च रोजी दरम्यान विशालनगर येथील रस्त्यावर फिर्यादी चालत जात असताना आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने ‘तू मुझे बहुत अच्छी लगती हो, आती क्या मेरे साथ घुमने’ असे म्हटले. फिर्यादी यांनी त्याला नकार दिला असता त्याने पुन्हा वारंवार फिर्यादी यांचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 25 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता विशालनगर येथे फिर्यादी यांच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहून त्यांचा विनयभंग केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button