आरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोवीस तासांत देशात 7,447 नवे कोरोना रुग्ण, 7,786 जणांना डिस्चार्ज

पुणे | देशात गेल्या 24 तासांत देशभरात 7 हजार 447 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 7 हजार 786 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 47 लाख 26 हजार 049 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 41 लाख 62 हजार 765 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 98.37 टक्के एवढा झाला आहे.

सध्या 86 हजार 415 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 391 रुग्ण दगावले असून, देशात आजवर 4 लाख 76 हजार 869 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.37 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 66.15 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच, कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 135.99 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button