breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोठी बातमी! महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरला, वाचा संपुर्ण यादी

मुंबई | महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं. महाविकास आघाडीत ठाकरे गट २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागांवर लढणार आहे. महत्वाचं म्हणजे भिवंडीची जागा शरद पवार गटच लढणार आहे. तर सांगलीची जागा ठाकरे गट लढणार आहे.

महाविकास आघाडीची शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे जागा वाटप करण्यात आलं.

हेही वाचा    –      राज्यात पुढील तीन दिवस पाऊस; हवामान विभागाचा इशारा

शिवसेना ठाकरे गटाच्या २१ जागा

जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई.

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) १० जागा

बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड.

काँग्रेसच्या १७ जागा

नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमुर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button