breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

Hmmm…५० दिवसानंतर प्रार्थना बेहरे भेटली नवऱ्याला 😉

मुंबई | करोनाचा संपर्क रोखण्यासाठी २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आली. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, देशभरात लॉकडाऊन असल्यानं अनेकजण आपल्या घरापासून लांब अडकले आहेत. कोणी परदेशात अडकलं आहे तर कोणी इतर राज्यात. ट्रेन , विमानप्रवास, रस्ते वाहतूक सर्व काही बंद असल्यानं घरी जाण्याचे मार्ग सर्व मार्ग बदं झाले होते. अडकेल्या व्यक्ती परवानगी आणि योग्य त्या सर्व नियमांचे पालन करून आपल्या घरी जाऊ शकत आहेत.

https://www.instagram.com/p/B_4LD-pFZir/?utm_source=ig_embed

अभिनेत्री पार्थना बेहरे ही तब्बल ५० दिवसांनंतर तिच्या घरी आली आहे. हा सर्व अनुभव तिनं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. लॉकडाऊन घोषित केला तेव्हा प्रार्थना तिच्या माहेरी वडोदरा इथं होती. पण तिचा नवरा मुंबईत होता. अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळं तिला मुंबईत येता आलं नाही. प्रार्थना आता मुंबईत परतली असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं नवऱ्यासोबतचा एक फोटो टाकत ‘मी घरी आलेय’ असं कॅप्शनही लिहीलं आहे. #after50days हा हॅशटॅग वापर तिनं ५० दिवसानंतर नवऱ्याची भेट झाल्याचं सांगितलं. नवऱ्या भेटल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button