breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भूकंपाच्या धक्क्याने घराची भिंत अंगावर पडून एकाचा मृत्यू

पालघर –  बोर्डी- डहाणू, तलासरी भागात रात्री एकच्या सुमारास 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांनी नागझरी, वसावलापाडा येथील शेतावरील घर पडल्याने, त्यात झोपलेल्या मेघवाले ( वय 55 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. पालघर जिल्हाधिकारी, डहाणू प्रांत अधिकारी घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.

पालघरमधील डहाणूतील नागझरी, वसावलापाडा येथे सकाळी 1 वाजताच्या सुमारास 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. सदर घटनेत नागझरी, वसावलापाडा येथील रिष्या मेघवाले (स्त्री/ वय 55 वर्षे) यांचे घर अंगावर कोसळल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button