breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

तुम्हालाही इस्रोमध्ये करिअर करायचंय? तर निवडा ‘हे’ कोर्स

ISRO Career : इस्त्रोमध्या काम करण्याचा मोह प्रत्येकालाच असतो. त्यात अंतराळ आणि अंतराळ संशोधन विषयाची रूची असणाऱ्या अनेकांसठी हा जिव्हाळ्याचा विषय ठरतो. मात्र ISRO मध्ये काम करण्यासाठी कोणता अभ्यासक्रम निवडावा याबाबत जाणून घेऊया..

Aerospace Engineering

स्पेसेसशिपमधील किंवा उपग्रहांमधील प्रणालीचे एकीकरण आणी कार्यप्रणालीवर नजर ठेवण्याचे कामही एरोस्पेस इंजिनिअरिंग करतात. शिवाय, अत्याधुनिक वैमानिक वाहनांचे डिझायनिंग आणि उत्पादन हाही यातील मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे.

Avionics Engineering

एव्हीओनिक्स इंजिनिअरिंग केलेली व्यक्ती नवनवीन डिझाईन्स विकसित करणे आणि त्यांची चाचणी करण्याचे काम करतात. ISRO मधील एव्हीओनिक्स अभियंते विमान आणि अंतराळ यानाचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करणार्‍या इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे काम सुरळीतपणे सुरु असल्याचे सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही यांच्यावर असते.

हेही वाचा – महावितरणकडून ग्राहकांना जोराचा करंट; ग्राहकांना बसणार ८८५ रुपयांचा भुर्दंड

Geospatial Engineering

भौगोलिक डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे आणि त्याचा अर्थ लावणे म्हणजे भौगोलिक अभियांत्रिकी. ISRO भूस्थानिक अभियंते मॅपिंग, नेव्हिगेशन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएसचा वापर करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील डेटा गोळा आणि विश्लेषण करण्यासाठी केला जातो.

Remote Sensing

इस्रो रिमोट सेन्सिंग शास्त्रज्ञ उपग्रह आणि इतर रिमोट सेन्सिंग डेटा गोळा आणि विश्लेषण करतात. ते पृथ्वीची जमीन, समुद्र, वातावरण आणि नैसर्गिक संसाधनांबद्दल डेटा गोळा करण्यासाठी ऑप्टिकल आणि रडार सेन्सर वापरतात. हा डेटा हवामानाचा अंदाज, कृषी निरीक्षण आणि पर्यावरणीय मूल्यमापनासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button