breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

युपीएससी परीक्षेच्या उमेदवारांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्याची परवानगी

युपीएससी परीक्षेच्या उमेदवारांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सध्या कोरोना व्हायरसचे महासंकट ओढावले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच शैक्षणिक वर्ष अद्याप सुरु सुद्धा झालेले नाही. मात्र विविध परीक्षा पुढे ढकल्यानंतर आता त्या पार पडणार आहेत. याच पार्श्वभुमीवर अद्याप लोकल सेवा सामान्यांसाठी सुरु करण्यात आलेली नाही. फक्त अत्यावश्यक सेवा सुविधांमधील कर्मचारी प्रवास करत आहेत. पण आता युपीएससीच्या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती युपीएससीच्या सेक्रेटरी यांनी केली आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या काळात ट्रेनने 3 आणि 4 ऑक्टोंबरला प्रवास करता येणार आहे. ही परीक्षा देशभरातील 2569 केंद्रांवर पार पडणार आहे.

युपीएससीच्या उमेदवारांना मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. परंतु परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांनी Call Letter आणि I-Card रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी दाखवावे अशी अट घालण्यात आली आहे. याबद्दल पश्चिम रेल्वेने माहिती दिली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button