breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

लक्ष्य सुर्य! आदित्य एल-१ च्या लँचिंगची तारीख-वेळ ठरली!

थेट प्रेक्षेपण पाहता येणार, इस्त्रोची माहीती

Aditya L1 : ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आता आपलं यान सुर्याच्या दिशेने पाठवणार आहे. ‘आदित्य एल-१’ असं या सौर मोहिमेचं नाव आहे. हे अवकाशयान आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून २ सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. सकाळी ११.५० वाजता हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावेल.

सूर्याचा अभ्यास करेल. सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळं आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्वच गोष्टींचा अभ्यास करणार आहे.

हेही वाचा – तुम्हालाही इस्रोमध्ये करिअर करायचंय? तर निवडा ‘हे’ कोर्स 

राष्ट्रीय अंतराळ संस्थेने नागरिकांना ‘आदित्य एल-१’ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नागरिकांना याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp या लिंकवर नोंदणी करावी लागेल. SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून हे प्रक्षेपण लोकांना पाहता येणार आहे. ISRO ने द्वीट करत नागरिकांना प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button