breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

IND vs AUS : बॉलशी छेडछाड प्रकरणी रवींद्र जडेजावर ICC ची कारवाई

जडेजाला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला

IND vs AUS : भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर टॉफीतील पहिला सामना नागपुरमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर १३२ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने हा सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू रविद्र जडेजा बोटाला मलम लावून गोलंदाजी करत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलिया संघाने केला. यावरून आयसीसीने भारतीय संघाला मोठा झटका दिला आहे.

नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल क्रिकेटपटू रवींद्र जडेजाला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. जडेजाच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला. 9 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या 46 व्या षटकात घटना घडली, जेव्हा जडेजा त्याच्या बोटाला सुखदायक क्रीम लावताना दिसला, असं आयसीसीने म्हटलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडजाने बोटावर क्रीम लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मोहम्मद सिराज बोटावर क्रीम लावत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. बोटाला किंवा तोंडाला क्रीम लावणं नियमाचं उल्लंघन नाही पण बॉल हातात ठेवून बोटाला क्रीम लावल्याने जडेजावर बॉल टेम्परिंगचा आरोप केला.

आरोपानंतर स्वत: जडेजा आणि कर्णधार रोहित शर्माला सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टने बोलावून घेतले. त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून या घटनेते वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महत्वाचे म्हणजे या प्रकरणी मॅच रेफरी अँड पायक्रॉफ्ट यांनी भारतीय संघालाही समन्स बजावला होता. भारतीय संघाचा कर्णधार रोहितने या प्रकरणाची वास्तविकता मॅच रेफरींना सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button