breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्थ पवार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेला अचानक भेट

  • आयुक्त राजेश पाटील यांच्याशी केली बराचवेळ चर्चा
  • गोपनिय भेटीमागे उमटतोय नेत्यांच्या नाराजीचा सूर

पिंपरी / महाईन्यूज

राष्ट्रवादीचे युवानेते पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची आज मंगळवारी अचानकपणे भेट घेतली. शहरातील विविध प्रश्नांवर आयुक्तांसोबत त्यांनी चर्चा केल्याचे समजते. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना घातक असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सूक्ष्म नियोजन करावे. उद्योगनगरीत १८ ते ४४ वयोगटात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग असल्याने त्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे, अशा सूचना त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्याची माहिती कळाली आहे.

पार्थ पवार यांनी आपल्या भेटीबाबत अत्यंत गुप्तता बाळगली आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांना सोबत न घेताच पार्थ पवार यांनी महापालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेतली. कोरोना काळात नेता आला की कार्यकर्ते गर्दी करतात. सोशल डिस्टन्ससिंगचा बोजवारा उडालेला दिसतो. यामुळे पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांविना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे केलेल्या कामांचा गाजावाजा न करता काम करत राहणे हेच सूत्र आमलात आणून पार्थ पवार काम करत असतात.

पार्थ पवार यांची विद्यमान पदाधिका-यांवर नाराजी

मागील वर्षी कोरोना काळात दिवंगत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या घरी अचानक पार्थ पवार यांनी भेट दिली होती. तसेच, तात्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२ जुलै रोजी वॉर रूमलाही भेट दिली होती. शहरात माजी आमदार विलास लांडे यांनी पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाकाळात मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य वितरण, रक्तदान शिबीर घेतले. रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, आर्थिक परिस्थितीने कमजोर रुग्णांची बिले कमी करून देणे आदी उपक्रम राबवले आहेत. तरीही सोशल डिस्टंन्सिंग नियमाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पार्थ यांनी गोपनियरित्या आयुक्तांची भेट घेतली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघरे यांनी देखील रक्तदान शिबिर आणि पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पार्थ यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली नाही. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कमी पण भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कदाचित, यामुळे पार्थ यांनी नाराजी व्यक्त करत कार्यक्रमातील उपस्थिती टाळली असावा, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांना सुध्दा याची काहीच कल्पना नव्हती. कदाचित विरोधी पक्षनेते आपले कर्तव्य बजावण्यात कमी पडत असल्यामुळेच पार्थ यांनी आयुक्तांची भेट घेऊन शहरातील नागरिकांच्या आरोग्यासंबंधीत मागण्या केल्या असाव्यात. विरोधी पक्षनेत्याने जर जातीने पालिकेत लक्ष घालून काम केले तर नेत्याला खाली बघण्याची गरज उरत नाही. कदाचित, हे पदाधिकारी पक्षाप्रती कर्तव्य आणि निष्ठा बजावण्यात कमी पडत आहेत, असे वाटत असावे म्हणूनच पार्थ यांना पालिकेत लक्ष घालावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेत भाजप सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीचा आवाज दबला गेला आहे. सत्ताधारी भाजपकडून भ्रष्टाचार होत असताना राष्ट्रवादीचे विद्यमान पदाधिकारी मुग गिळून गप्प आहेत. प्रत्येक ठेक्यात त्यांचाही सहभाग असल्याने हाताची घडी तोंडावर बोट अशी अवस्था पक्षाची आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची भाजपसोबत किती सलगी आहे हे आता वरीष्ठ नेत्यांनाही कळून चुकले आहे. बहुतेक त्यामुळेच की काय, पार्थ यांनी पक्षाच्या सर्व पदाधिका-यांना गाफील ठेवून पालिकेत भेट दिली असावी, अशी चर्चा केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button