TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

कसबा मतदार संघात अनोखी बॅनरबाजी ः आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा…

पुणे : पुणे पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात आता बॅनरबाजी जोरावर असल्याचं दिसतंय. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र टिळक परिवारातील सदस्याला उमेदवारी देण्याऐवजी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे पुन्हा नाराजी पाहायला मिळत आहे. कसबा पेठेत अनोखे बॅनर लागले असून टिळकांच्या घरात उमेदवारी दिली नसल्याबद्दल पोस्टरमधून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा…
कसबा हा गाडगीळांचा
कसबा हा बापटांचा…
कसबा हा टिळकांचा
का काढला आमच्याकडून कसबा
आम्ही दाबणार नोटा

हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर कसबा पेठेत भाजपचा पारंपरिक मतदार असलेला ब्राम्हण समाज नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने कसब्यात बॅनरबाजी करण्यात आली असून, या माध्यमातून ब्राम्हण समाजावर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधीही, ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले होते. हाच धागा पकडून हिंदू महासंघाचे आनंद दवे कसब्याच्या रिंगणात उतरले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button