breaking-newsक्रिडा

#HWC2018 : इंग्लंडचा पराभव करत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी

भुवनेश्वर- हाॅकी विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने एकतर्फी लढतीत इंग्लंडचा 8-1 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या टाॅम क्रेगने या सामन्यात गोलची हॅट्रीक केली.

ऑस्ट्रेलियाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत इंग्लंडवर दबाव बनवला. पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलियाने दोन गोल केले. ब्लॅक गोवर्सने 8 व्या मिनिटाला गोल करत  आॅस्ट्रेलियाचे खाते उघडले. त्यानंतर लगेचच 9 व्या मिनिटाला टाॅम क्रेगने ऑस्ट्रेलियासाठी आणखी एक गोल केला. टाॅम क्रेगने 9व्या , 19व्या आणि 34 व्या मिनिटाला मैदानी गोल केले. ट्रेंट मिटनने 32 व्या मिनिटाला पेनल्टी काॅर्नरवर गोल करत ऑस्ट्रेलियाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच पुढच्या मिनिटाला टीम ब्रांडने आणखी एक गोल केला.

इंग्लंडकडून एकमात्र गोल तिसऱ्या बैरी मिजिलटनने केला. सामन्याच्या शेवटच्या तीन मिनिटात मिळालेल्या दोन पेनल्टी काॅर्नरचे रूपांतर ऑस्ट्रेलियाच्या जेरेमी हॅवर्डने गोल मध्ये करत संघाचा 8-1 ने विजय निश्चित केला व  स्पर्धेतील तिसरे स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला नेदरलॅंडकडून तर इंग्लंडला बेल्जियमकडून पराभव स्विकारावा लागला होता.

View image on Twitter

International Hockey Federation

@FIH_Hockey

Wow what a win!! Bronze medal goes to Australia!! 🥉👏
ENG 1 AUS 8
Odisha #HWC2018 Bhubaneswar @Kookaburras @EnglandHockey @TheHockeyIndia
📸FIH/@GettySport

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button