breaking-newsक्रिडा

विश्‍वचषक हॉकी स्पर्धा 2018: नेदरलॅंडचा पराभव करत बेल्जियम विश्‍वविजेता

भुवनेश्‍वर- येथे होत असलेल्या हॉकी विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेल्जियमच्या संघाने नेदरलॅंडच्या संघाचा 3-2 असा पराभव करताना विश्‍वविजेतेपद पटकावले असून संपुर्ण सामन्यासह पेनल्टी कॉर्नरमध्ये दोन्ही संघ बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल सडन डेथ पद्धतीने करण्यात आला यात बेल्जियमने बाजी मारत स्पर्धेचे विजेतेपद आपल्यानावे केले.

संपुर्ण सामन्यात बेल्जियम आणि नेदरलॅंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ सादर करत गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र दोन्ही संघांना सामन्यत गोल करण्यात अपयश येत होते. त्यातच पहिल्या हाफ मध्ये बेल्जियमच्या आक्रमक खेळा समोर नेदरलॅंडच्या बचावपटूंनी सावध खेळाचे प्रदर्शन करताना बेल्जियमला आपल्या गोल पोस्ट पासून दुर ठेवण्यात यश मिळवले. त्यात पहिल्या हाफच्या 51 % वेळ बेल्जियमने चेंडू आपल्या ताब्यात ठेवला होता. मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आल्याने पहिल्या हाफमध्ये एकही गोल होउ शकला नाही. तर, दुसऱ्या हाफ मध्येही बेल्जियमला गोल करण्यात अपयश आले मात्र त्यांनी आपला आक्रमक खेळ सुरुच ठेवला होता. मात्र, नेदरलॅंडला बेल्जियमच्या गोल पोस्ट वर आक्रमण करण्यात सातत्याने अपयश येत होते. त्यात्च बेल्जियमने एक दोन वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात अपयश आल्याने दुसऱ्या हाफ मध्येही गोल होउ शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button