breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना शहरप्रमुख खासदारांच्या हातातला कळसुत्रा बाहुला

– योगेश बाबर यांनी स्वताची लायकी तपासून बोलावे

– असले आठशे बाबर खिशात घेवून फिरतो 

– योगेश बाबर यांना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे खणखणीत दिले प्रत्युत्तर

पिंपरी ( महा ई न्यूज ) – आक्रमक शिवसेनेचा पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर हे वाघ नसून शेळी आहेत. ते केवळ खासदार श्रीरंग बारणेच्या हातातील बाहूले आहे. त्यांंना महापालिका निवडणूकीत नगरसेवक म्हणून निवडून येता आले नाही. त्यामुळे त्यांनी स्वताःची लायकी तपासून बोलावे, मला भाजपने खरेदी केल्याचे त्यांनी सिध्द करुन दाखविल्यास मी राजकारण सोडून देईन, अन्यथा त्यांनी राजकारण सोडावे,असे आव्हान विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी केले.  

साने म्हणाले की, योगेश बाबर हे आता राजकारणात आले आहेत. त्यामुळे बालिश कोण आहे, हे लोकांना चांगले समजते. बाबर यांच्यासारखा मी साताऱ्याहून पिंपरी-चिंचवडला आलेलाे नाही, मी स्थानिक असून मला काही कमी नाही. त्यामुळे मला खरेदी करणारा अजून जन्माला यायचा असून असले आठशे बाबर मी खिशात घेवून फिरतो. असे गंभीर आरोप त्यांनी केला.
योगेश बाबरांचे स्वताःचे कार्य कर्तृत्व आहे. त्याचे चुलते गजानन बाबर खासदार होते, वडील मधुकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर नगरसेवक होत्‍या. मला तसा कोणताही राजकीय वारसा नाही, मला राजकीय वारसा लाभलेला नाही तर स्वतः घडलो आहे. म्हणूनच मला उत्तर देण्याची योगेश बाबर यांची पात्रता आणि त्यांची लायकीही नाही. अजून नगरसेवकही होता न आलेल्या बाबर यांनी स्वतःची पात्रता ओळखून असावे, असा टोला साने यांनी बाबर यांना लगावला.  तसेच पार्थ पवारांचे कर्तृत्व काय, असे विचारणाऱ्या बाबरांनी प्रथम स्वतःचे कर्तृत्व सांगावे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना पार्थ पवार कोण आहे हे कळते, मात्र बाबर यांना कळत नाही. यातूनच बाबर हे किती बलिश आहेत, हे दिसून येते. असे सांगत साने यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button