PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगार किती? संपत्ती किती? वाचा सविस्तर..

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपने देशभरातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभर सेवा सप्ताह पाळला जाणार आहे. नरेंद्र मोदी गेल्या नऊ वर्षापासून पंतप्रधानपदी आहेत. त्यांची संपत्ती किती आहे? त्यांना पगार किती आहे? जाणून घ्या सविस्तर..
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटेच राहतात. भारताच्या पंतप्रधानांना वर्षाला २० लाख रुपये पगार दिला जातो. त्या हिशोबाने मोदी यांना महिन्याला जवळपास दोन लाख रुपये पगार मिळतो. या पगारात बेसिक पे, डेली अलाऊन्स, खासदार निधीसहीत अन्य भत्ते समाविष्ट आहेत. मोदींकडे अचल संपत्ती नाहीये.
हेही वाचा – राज्यात पुढचे ५ दिवस पावसाचे, विविध जिल्ह्यांना ऑरेंजसह यलो अॅलर्ट जारी
मोदी यांनी बाँड, शेअर आणि म्युच्यूअल फंडमध्ये कोणतीच गुंतवणूक केलेली नाही. त्यांच्याकडे स्वत:चे एकही वाहन नाही. मात्र, मार्च २०२२ च्या एका डेटानुसार त्यांच्याकडे १.७३ लाख रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या होत्या. त्यांनी पोस्टात ९,५,१०५ रुपये बचत केलेले आहेत. तर १,८९,३०५ रुपयांच्या जीवन विमा पॉलिसी काढल्या आहेत.