राज्यात पुढचे ५ दिवस पावसाचे, विविध जिल्ह्यांना ऑरेंजसह यलो अॅलर्ट जारी

पुणे : राज्यात गणपतीच्या आगमानाची तयारी सुरु असताना मान्सून सक्रीय झाला आहे. आज राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आजपासून पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र विभाग मुंबई यांच्या वतीनं पुढील पाच दिवसांसाठी म्हणजेच १६ ते २० सप्टेंबरच्या काळातील पावसाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा – Asia Cup 2023 Final : आठव्यांदा आशिया कप जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज!
हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी मुसळधार पावसची शक्यता आहे.