breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘मोदींचा समाना करणं हे काय येड्या गबाळ्याचं काम नाही’; रामदास आठवलेंचा टोला

उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी सक्षम नाहीत

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आगामी २०२४ निवडणुकांमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा असतील असं वक्तव्य केलं आहे. यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाना करणं हे काय येड्या गबाळ्याचं काम नाही, असा टोला लगावला आहे.

आपल्या देशात पंधरा-वीस पंतप्रधान पदाचे चेहरे आहेत. संजय राऊत म्हणत असतील तर त्यांनीही प्रयत्न करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समना करणं हे काय येडया गबाळ्याचं काम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ चे पंतप्रधान राहणार आहेत, त्याबद्दल आम्हाला चिंता अजिबात नाही, आम्ही देशाचा विकास केलाय, लोकांचे प्रश्न सोडवलेत, असं रामदास आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी सक्षम नाहीत. त्यांना महाराषट्राचं मुख्यमंत्रिपद त्यांना संभाळता आलं नाही, त्यामुळं कोणीही उठून पंतप्रधान पदाची भाषा वापरणं योग्य नाही, अशी टीका रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

सरकारविरोधात बोलाल तर जीव मारण्याचा प्रयत्न होतो, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यावर आठवले म्हणाले की, सरकार विरोधात चोर, गद्दार अशी भाषा वापरली जातेय, आम्ही कोणाचं तोंड बंद केलं नाही. जीवाचं संरक्षण करणारं आमचं सरकार आहे. त्यामुळं अशोक चव्हाण जे बोलताय ते योग्य नसल्याचंही यावेळी आठवलेंनी म्हंटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button